- Events /
- विठ्ठल नामाच्या गजरात, बालचमूंचा पालखी सोहळा
विठ्ठल नामाच्या गजरात, बालचमूंचा पालखी सोहळा
विठ्ठल नामाच्या गजरात, बालचमूंचा पालखी सोहळा
दि. २२ जुलै २०२६ रोजी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय, पूर्व प्राथमिक विभागात सकाळ व दुपार सत्रात पालखी सोहळा संपन्न झाला. काही बालचमू सुंदर अशा विठ्ठल रुक्मिणीच्या वेषात आले होते तर काही संत ज्ञानेश्वर महाराज ,संत तुकाराम महाराज यांचे पोषाख करून आले होते. सर्व मुलांनी विठ्ठल नामाच्या गजरात पालखी शाळेच्या आवारात फिरवून आणली. पालखी फिरवून आणताना मुले विठ्ठल नामाचा जयघोष करीत आनंदाने नाचत होते, टाळांचा आवाज,झेंडे व वरिष्ठ गटातील विद्यार्थ्याच्या मृदुंग वादनाने वातावरण अधिकच प्रसन्न झाले होते. सोनाली ताई, मनाली ताई यांनी सकाळ सत्रात तर अनुराधा ताई यांनी दुपार सत्रात वारीची माहिती सांगून गोष्ट सांगितली. त्यानंतर प्रशालेच्या मुख्याध्यापक मा. सौ. अपर्णा ताई साने, ज्येष्ठ शिक्षिका प्रज्ञा ताई पोतदार व वर्षा ताई बागडे यांनी विठ्ठलाची पूजा व आरती केली. प्रसाद म्हणून मुलांना साखरफुटाणे देण्यात आले.
या पालखी सोहळ्याचे नियोजन व मार्गदर्शन शाळेच्या मा. मुख्याध्यापक सौ. अपर्णा ताई साने यांनी केले होते.
कार्यक्रम
-
जागर
जागर
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सद ... Read More
-
🌸 संस्कारधारा – संस ...
शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६रोजी पूर्व प्राथमिक ... Read More
-
शिक्षक दिन
दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसा ... Read More
-
सणांची मौज
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलक ... Read More
-
गुरु पौर्णिमा