आनंददायी शाळा
खेळ गट : खेळाद्वारे व कृतीयुक्त शिक्षणावरती भर मुलांचे बोटांवरील नियंत्रण व स्नायूंची ताकद वाढण्यासाठी विविध क्रिया कलापांद्वारे शारीरिक विकासाला चालना दिली जाते शारीरिक हालचालींद्वारे व्यायामाची आवड निर्माण करणे.
स्थिरता व एकाग्रता
कनिष्ठ गट : बोटांच्या स्नायूंचा विकास होण्यासाठी विविध कौशल्य विकसित केली जातात. शैक्षणिक साधनांद्वारे भाषा, सामान्य ज्ञान ,अंक ज्ञानाची मूलभूत ओळख करून दिली जाते .व्यायाम, पूरक हालचालीं द्वारे शारीरिक विकास. मेंदूच्या विकासासाठी बौद्धिक खेळांवर भर.
सातत्यात वाढ
वरिष्ठ गट : शब्द संपत्तीत वाढ करून भाषिक विकास करणे,त्याद्वारे सवांद कौशल्य व आत्मविश्वास वाढविणे.गणितीय संकल्पना कृतीतून घेऊन समजावून व्यवहार ज्ञान वाढविणे.छोट्या प्रयोगांद्वारे विज्ञानाची आवड निर्माण करणे.प्राथमिक शिक्षणासाठी पाया पक्का करणे.दैनंदिन जीवनातील कृतियुक्त शिक्षण.भाषा विकास व वयानुसार शैक्षणिक ,सामाजिक,सांस्कृतिक व भावनिक गुणवत्तेत वाढ.