आमच्याबद्दल
माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय (पूर्व-प्राथमिक विभाग) मध्ये आपले सहर्ष स्वागत
ही आवडते मज मनापासुनी शाळा |
लाविते लळा ही, जसा माउली बाळा ||
डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पुण्यातील संस्थेची माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी ही शाळा टिळक रोड या पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी भरते. लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या पवित्र प्रांगणात १० जून १९८५ वर्षी न्यू प्री प्रायमरी स्कूल या नावाने सुरू झाली. मात्र कालांतराने आदरणीय गोळवलकर गुरुजींचे नाव या शाळेला देण्यात आले. आपली संस्कृती व संस्कार जपणारी तसेच सुसंस्कृत नागरिक निर्मितीचे ध्येय बाळणारी मराठी माध्यमाची अग्रगण्य शाळा म्हणून लवकरच नावारूपाला आली.
मुलांचा तीन ते सहा वयोगट लक्षात ठेवून शाळेमध्ये पूर्व प्राथमिक हा विभाग देखील सुरू करण्यात आला. प्रथम लहान गट व मोठा गट सुरू करण्यात आला व २०१४ यावर्षी खेळ गट सुरू करण्यात आला. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अभ्यासाबरोबरच नवनवीन उपक्रम राबविण्यात आले. जसे की जोडी तुझी माझी ,प्रकल्प दिन, संस्कृत बोली, स्पोकन इंग्लिश ,श्रावणी मौज, पालक शाळा, इत्यादी. वर्गातील भिंती, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विविध विषय घेऊन चित्ररूपाने रंगविण्यात आल्या त्यामुळे मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण झाली. प्रवेशासाठी गर्दी होऊ लागली.शाळेचे नाव उत्तम शाळा म्हणून प्रसिद्ध झाले .आपली शाळा नेहमी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असते. सर्व गोष्टी अतिशय मनापासून करणारे स्वतःच्या मुलाप्रमाणे विद्यार्थ्यांना जपणारे आपले शिक्षक तसेच कोणत्याही काम अगदी जबाबदारीने करणारे सर्व सेवक वर्ग असल्यामुळे शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे.
उद्दिष्ट
पूर्व प्राथमिक विभागातील 3 ते ६ वयोगटातील मुलांवर उत्तम संस्कार करणे. त्यांच्यामध्ये आदर, नम्रता व आत्मविश्वास वाढविण्यासाठी वैयक्तिक लक्ष देणे. मुलांमध्ये असणारे विविध सुप्त गुण ओळखून त्यांचा विकास करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे. देशाचा उत्तम नागरिक घडविणे, त्याकरिता वयोगटा नुसार विविध उपक्रमातून संस्कारक्षम शिक्षण देणे. प्रकल्प व सामुदायिक सहभागाद्वारे मुलांना सामाजिक आणि पर्यावरणाच्या जागरूकतेची ओळख करून देणे.
ध्येय
कौशल्यावर आधारित कृतीयुक्त शिक्षण देणे. शैक्षणिक बदलांना सामोरे जाण्यासाठी पालकांना उद्युक्त करणे. मुलांच्या मनात भारतीय संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न करणे .शाळेच्या गुणवत्तेत वाढ. मुलांना स्वावलंबनाचे शिक्षण देणे .सुरक्षित व आनंददायी शिक्षण. वयानुसार अनुभवातून शिकण्याची आवड निर्माण करणे.
आम्ही सर्वोत्तम का आहोत?
उत्कृष्ट शैक्षणिक घटक
शाळेतील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आव्हानात्मक बनवण्यासाठी , त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतांना प्राप्त करण्याकरिता आणि त्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे.
अनुभवी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
शाळेतील प्रत्येक घटक उत्साही, तंत्रस्नेही, उच्चविद्याविभूषित असून प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहेत.
अत्याधुनिक सुविधा
शाळेचा आधुनिक परिसर शिक्षणासाठी पोषक असून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी परिपूर्ण वातावरण मिळण्यास त्यामुळे मदत होते.