नमस्कार आज गोळवलकर शाळेचा खेळ गटाचा जागर कार्यक्रम खूप छान झाला.त्यासाठी सर्व ताईंचे ,मुख्याध्यापिका अपर्णाताई यांचे मी खूप खूप आभार मानते.या कार्यक्रमामुळे मुलांना नवरात्रीची, देवीच्या गळवलकर रूपांची छान माहिती मिळाली याचे पालक म्हणून मला समाधान मिळाले .खेळ गटाच्या तिन्ही वर्गातील मुलांनी आत्मविश्वासाने स्टेजवर कार्यक्रम सादर केला त्यासाठी मुलांचे व ताईंचे ही खूप कौतुक .तसेच सूत्रसंचालन करणाऱ्या ताईंनीही नवदुर्गेची तसेच आज-काल आघाडीवर असणाऱ्या महिलांची छान माहिती सांगितली. आजचा हा जागर कार्यक्रम उत्कृष्ट व शिस्तबद्ध होता .अशा या छान उपक्रमाबद्दल शाळेचे खूप खूप कौतुक. आपले पाल्य चांगल्या पद्धतीने घडत आहे हे पाहून आम्ही समाधानी आहोत .धन्यवाद
नमस्कार मी शर्वरी नचिकेत जोग. ऋषभ नचिकेत जोगची आई .आता तो गोळवलकर शाळेमध्ये खेळ गट जाई मध्ये आहे.आणि शाळेबद्दल सांगायचं झालं तर मला असं सांगायला आवडेल की आम्ही जेव्हा ऋषभला शाळेत घालायचे ठरवलं तेव्हा आमचा हा उद्देश होता की एकवेळ थोडं अभ्यासात उन्नीसबीस झालं मागे पुढे झालं तरी चालेल पण त्याच्यावर संस्कार चांगले व्हायला पाहिजेत. त्याच्या आजूबाजूचे वातावरण आणि या सगळ्याचा पुढे जाऊन त्याला कुठेतरी खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होईल त्याच्या पुढच्या आयुष्यात असा विचार करून आम्ही या शाळेत प्रवेश घेतला. आणि शाळा सुरू झाल्या पासून आत्तापर्यंत ऋषभ मध्ये खूप चांगले बदल मला बघायला मिळतात. आणि शाळे बद्दल सांगायचं झालं तर म्हणजे बहुश्रुत आणि खूप चांगल्या पद्धतीची कीर्ती आहे या शाळेबद्दल. ताईंचे शिकवणे त्यांचं मुलांना वळण लावणं अगदी आपलं मूल आहे असं समजून मुलांशी वागणं .आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांवरचे संस्कार आणि बरोबरीने अभ्यास तर आहेच, ह्या सगळ्याच गोष्टी खूप छान पद्धतीने शाळेमध्ये घेतल्या जातात. श्लोक पठण असेल रोजची प्रार्थना असेल किंवा आपलं मूल सगळ्यांमध्ये कसा वेगळा उठून दिसेल याबाबतचा केलेला प्रयत्न असेल या सगळ्याच मुद्द्यांमध्ये शाळा खूप आग्रेसर आहे आणि हे आम्ही आमचं भाग्य समजतो की, आम्हाला या शाळेत प्रवेश घेता आला.
नमस्कार माझं नाव वेदा चेतन हिंगे माझा पाल्य उत्कर्ष हिंगे हा माधव सदाशिव गोवळकर विद्यालयाचा खेळ गटाचा विद्यार्थी आहे. माणसाच्या व्यक्तिमत्व विकासात शाळेचा खूप मोठा वाटा असतो त्याच्यावर होणारे संस्कार त्याच शिक्षण हे मातृभाषेतूनच अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि म्हणूनच आम्ही उत्कर्षसाठी गोळवलकर विद्यालयाची निवड केली. अर्थातच आम्ही शाळेबद्दल खूप चांगले ऐकून होतो ,शाळेचा अभिप्राय आमच्यापर्यंत खूप चांगला आला होता .बऱ्याच जणांनी शाळेचे स्तुतीच केली होती. आणि आमचा अनुभवही अगदी तसाच आहे. शाळेतले शिक्षकच नाही तर मावशी काका असे सर्वच शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा मुलांची अगदी स्वतःच्या मुलासारखी काळजी घेतात, त्यांच्यावर माया करतात, आणि म्हणूनच कदाचित मुलांना खूप लवकरच शाळेचा लळा लागला आहे. मुलं अगदी उत्साहात शाळेत जातात .ताई शिकवतील तसं भजन, प्रार्थना आनंदाने म्हणत असतात, अगदी मनापासून अभ्यास करतात. उत्कर्षमध्येही आम्हाला खूप सकारात्मक बदल दिसायला लागले आहेत. आमची मुलं या शाळेतून खूप चांगली घडतील याबद्दल आम्हाला खात्री वाटते. धन्यवाद!