सौ. अपर्णा साने
मुख्याध्यापक
पूर्व प्राथमिक विभागातील मुलांचा वयोगट हा तीन ते सहा वर्षे असतो. सहाव्या वर्षापर्यंत मुलांचे शरीर ,मन आणि बुद्धी यामध्ये अतिशय वेगाने बदल घडून येतात. बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी ही सहा वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. आपली शाळा या वयातील बालकांना शरीर, मन आणि बुद्धी यांच्या विकासाला हवी असलेली दिशा देण्याचे काम करते. विकासाची गती वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असते .या करिता विविध उपक्रम आयोजित केले जात असतात.आधुनिक जीवनशैली मुळे पालकांना ही देशाची भावी पिढी घडवित असताना सतत सतर्क राहावे लागत आहे.
मुलांची मानसिकता ओळखून योग्य ते बदल घडवून आणण्यासाठी शिक्षक आणि पालक यांना एकत्रित येऊन पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे.आपली शाळा नेहमी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असते.सर्व गोष्टी अतिशय मनापासून करणारे, स्वतःच्या मुलाप्रमाणे विद्यार्थ्यांना जपणारे आपले शिक्षक,तसेच कोणतेही काम अगदी जबाबदारीने करणारे सर्व सेवक वर्ग असल्यामुळे शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. अर्थात या मध्ये संस्थेतील पदाधिकारी यांचा मोलाचा वाटा आहे.आपली शाळा उत्तम संस्कार देण्यासाठी नेहमीच अग्रेसर आहे.संस्कारांचा अनमोल ठेवा जपून एक उत्तम माणूस घडावा या दृष्टीने शाळा नेहमीच प्रयत्नशील राहील .यासाठी पालक देखील सहकार्य करतील अशी मी आशा व्यक्त करते.