- Events /
- जागर
जागर
जागर
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील पूर्व प्राथमिक विभागाच्या खेळ गटाचा ‘जागर’ हा सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मुलांना आपल्या भारतीय संस्कृतीची, सणांची आणि परंपरांची ओळख करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय सौ. कल्पनाताई धालेवाडीकर उपस्थित होत्या. तसेच विद्याभारतीचे केंद्रीय सह संघटनामंत्री श्री. राम आरावकर, जान्हवीताई आयाचित, शाळा समितीचे अध्यक्ष श्री. मकरंद पाटील सर आणि पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अपर्णाताई साने यांची उपस्थिती लाभली.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालकांना कृतीयुक्त व अनुभवाधारित शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे.खेळ गटातील सकाळ व दुपारच्या सत्रांतील बालचमूंनी नवरात्रोत्सवाची ओळख विविध नृत्यप्रकारांतून करून दिली. देवीचा जागर, देवीचा गोंधळ, गरबा, दांडिया, भोंडला, कुमारीका पूजन, पाटीपूजन, शस्त्रपूजन आणि अष्टभुजा यांचे सुंदर सादरीकरण करण्यात आले.अवघ्या तीन ते चार वर्षे वयोगटातील बालचमूंनी ताल, लय आणि हालचाली यांचा समन्वय साधत आत्मविश्वासाने सादरीकरण केले. त्यांच्या निरागस अभिनयाने आणि उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमात रंगत आणली.शाळेतील ताईंप्रमाणेच मावशीदेखील मुलांची अत्यंत आत्मीयतेने काळजी घेतात. त्या प्रत्येक काम तत्परतेने करतात. त्यांच्या या मोलाच्या योगदानाची दखल घेऊन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अपर्णाताई साने यांनी मावशींचा ‘नवदुर्गा’ म्हणून सन्मान केला. या उपक्रमातून शाळेतील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे असल्याची जाणीव करून देण्यात आली.प्रमुख पाहुण्या सौ. कल्पनाताई धालेवाडीकर यांनी आपल्या मनोगतात मराठी माध्यमाच्या शाळेत मुलांना प्रवेश दिल्याबद्दल पालकांचे अभिनंदन केले. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा, कुटुंबात पारदर्शकता ठेवावी आणि परिस्थितीचा स्वीकार करून सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जावे, असा मोलाचा संदेश त्यांनी पालकांना दिला. बालचमूंच्या सुंदर सादरीकरणाबद्दल त्यांनी शिक्षकांचे विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अपर्णाताई साने यांनी केले, तर सूत्रसंचालन सौ. शीतल मंगळवेढेकर यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी व मार्गदर्शनासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अपर्णाताई साने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रम
-
जागर
जागर
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सद ... Read More
-
🌸 संस्कारधारा – संस ...
शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६रोजी पूर्व प्राथमिक ... Read More
-
शिक्षक दिन
दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसा ... Read More
-
सणांची मौज
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलक ... Read More
-
गुरु पौर्णिमा