• Events
  • /
  • गुरु पौर्णिमा

गुरु पौर्णिमा

गुरु पौर्णिमा

*गुरुपौर्णिमा*

*गुरू ईश्वर तात माय

गुरुविण जगी थोर काय* 

 दिनांक २९  जुलै २०२६ रोजी माधव सदाशिव गुरुजी विद्यालयात गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रम उत्साहात पार पडला. आपल्या आई वडिलांच्या नंतर आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान असते ते म्हणजे गुरूंचे.गुरुप्रती कृतज्ञता,आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे "गुरुपौर्णिमा". या दिवसाचे औचित्य साधून माधव सदाशिव  गोळवलकर गुरुजी विद्यालयातील पूर्व - प्राथमिक विभागातील सकाळ व दुपार सत्रामध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पवित्र आणि चैतन्यमय वातावरणात पार पडला .बाल वयात संस्काराचे बीज पेरावे यासाठी वेगवेगळे उपक्रम शाळेमध्ये आयोजित केले जातात. सकाळ सत्रासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून चारुता प्रभुदेसाई व दुपार सत्रामध्ये  प्रमुख पाहुण्या वर्षाताई करंदीकर या लाभल्या होत्या. तसेच पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक माननीय सौ अपर्णा साने व शिक्षकप्रतिनिधी सौ प्रज्ञा पोतदार त्याचबरोबर आपल्या प्रशालेचे सर्व गटांचे पालकप्रतिनिधी देखील याप्रसंगी उपस्थित होते.आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुशिष्याची परंपरा प्राचीन काळापासूनच चालत आली आहे,ही परंपरा आपल्या मुलांना समजावी या साठी गुरूंचे महत्त्व सांगणारे  नाटक दोन्ही सत्रातील मुलांनी उत्तमरीत्या सादर केले.आई हा मुलांचा पहिला गुरु असल्याने हा संस्कार मुलांमध्ये रुजावा यासाठी सकाळ व दुपारसत्र मध्ये  मुलांसाठी  मातृपूजनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

मा.मुख्याध्यापक अपर्णा साने यांच्या मार्गदर्शनाने गुरुपौर्णिमा हा कार्यक्रम खूप आनंदात व प्रसन्न वातावरणात पार पडला.

कार्यक्रम

  • जागर

    जागर

    जागर

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सद ... Read More

  • 🌸 संस्कारधारा – संस्कार, संस्कृती आणि कलेचा सुंदर संगम! 🌸

    🌸 संस्कारधारा – संस ...

    शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६रोजी पूर्व प्राथमिक ... Read More

  • शिक्षक दिन

    शिक्षक दिन

    दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसा ... Read More

  • सणांची मौज

    सणांची मौज

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलक ... Read More

  • गुरु पौर्णिमा

    गुरु पौर्णिमा

    *गुरुपौर्णिमा*

    *गुरू ईश्वर तात माय

    ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स