- Events /
- शिक्षक दिन
शिक्षक दिन
दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात ‘शिक्षक दिन’ अतिशयउत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीराम चौथाईवाले सर तर श्री.अमित कुलकर्णी सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.शिक्षक दिना निमित्ताने देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षिका मा. मनाली ताई मांडके यांना देण्यात आला.डॉ. चौथाईवाले सर यांनी आपल्या मनोगतात भारतीय शिक्षणाची उज्ज्वल परंपरा व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच पू. गोळवलकर गुरुजी यांच्याबद्दल काही आठवणी सांगितल्या व त्यांच्या नावाने असलेली आपली शाळा केवळ शाळा नसून आपली जबाबदारी आहे असे सूचित केले. मा. अमित कुलकर्णी सर यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या वाढत्या आलेखाचा आढावा घेत शाळेचे व शिक्षकांचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हय़ात आपल्या शाळेची शाखा सुरू व्हावी अशी इच्छा व्यक्त केली,तसेच पू. गोळवलकर गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन शाळेतील सर्व पालकप्रतिनिधींनी केले तसेच या सर्व कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन प्रशालेच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक मा. सौ. अपर्णा ताई साने , प्राथमिक विभाग व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक मा. सौ. वासंती ताई बनकर यांनी केले.
कार्यक्रम
-
जागर
जागर
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सद ... Read More
-
🌸 संस्कारधारा – संस ...
शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६रोजी पूर्व प्राथमिक ... Read More
-
शिक्षक दिन
दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसा ... Read More
-
सणांची मौज
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलक ... Read More
-
गुरु पौर्णिमा