• Events
  • /
  • सणांची मौज

सणांची मौज

सणांची मौज

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील पूर्व प्राथमिक विभागाच्या कनिष्ठ गटाचा ‘सणांची मौज’  हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय सौ. अनघाताई गोखले लाभल्या. तसेच पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक माननीय सौ. अपर्णाताई साने आणि प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय सौ.वासंती बनकर यांची उपस्थिती लाभली.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मुलांना कृतीयुक्त व अनुभवाधारित शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार मुलांना आपल्या सणांची, संस्कृतीची आणि परंपरांची ओळख व्हावी, हा या कार्यक्रमचा मुख्य उद्देश होता.कनिष्ठ गटातील सकाळ व दुपार सत्रातील बालचमूंनी आपल्या हिंदू संस्कृतीतील विविध सणांची ओळख नृत्याद्वारे करून दिली. दीप अमावस्या, नागपंचमी, रक्षाबंधन, मंगळागौर,गणपती, दहीहंडी, श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवार या सणांचे सुंदर सादरीकरण करण्यात आले.आजच्या कार्यक्रमाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे प्रशालेच्या मुख्याध्यापक माननीय सौ अपर्णाताई साने यांच्या कल्पनेतून उदयास आलेले पुण्यातील मानाचे पहिले पाच गणपती असे म्हणतात की, आपण आपली संस्कृती तशीच पुढच्या पिढीकडे द्यावी ,या उद्देशाने पुण्यातील मानाच्या गणपतीचा इतिहास या गाण्याद्वारे सादर करण्यात आला..... तसेच हे गाणे देखील आपल्याच प्रशालेच्या पालकांनी लेखन गायन व संगीतबद्ध केले आहे.डॉ.निखिल पाठक यांनी या गाण्याचे लेखन केले ,सौ स्नेहल नेवासकर यांनी या गाण्याचे गायन केले व श्री निमिष जोशी यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे .या गाण्यासाठी आपल्याच प्रशालेच्या पालकांची साथ देखील मिळाली.तीन ते पाच वर्षे वयोगटातील बालचमूंनी अवयवांचा समन्वय साधत सुंदर सादरीकरण केले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. अनघाताई गोखले यांनी आपल्या मनोगतात संस्कृती जपणाऱ्या शाळेत मुलांना घातल्याबद्दल पालकांचे अभिनंदन केले. आपल्या सण-परंपरा जपत, त्या निमित्ताने विविध पदार्थ तयार करून मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख करून द्यावी, असे त्यांनी सांगितले. त्यांनी मुलांसोबत गणपतीचे सुंदर गाणे देखील म्हणले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. अपर्णाताई साने यांनी केले, तर सूत्रसंचालन सौ. मनालीताई मांडके यांनी केले.सणांची मौज  या कार्यक्रमातून बालमनात आपल्या संस्कृतीची आणि परंपरांची सुंदर बीजे रुजविण्याचा आनंददायी अनुभव मिळाला.या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी व मार्गदर्शनासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापक सौ. अपर्णाताई साने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रम

  • जागर

    जागर

    जागर

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सद ... Read More

  • 🌸 संस्कारधारा – संस्कार, संस्कृती आणि कलेचा सुंदर संगम! 🌸

    🌸 संस्कारधारा – संस ...

    शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६रोजी पूर्व प्राथमिक ... Read More

  • शिक्षक दिन

    शिक्षक दिन

    दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसा ... Read More

  • सणांची मौज

    सणांची मौज

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलक ... Read More

  • गुरु पौर्णिमा

    गुरु पौर्णिमा

    *गुरुपौर्णिमा*

    *गुरू ईश्वर तात माय

    ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स