- Events /
- शालेय क्रीडा दिन २०२४
शालेय क्रीडा दिन २०२४
खूप खूप मस्ती करूया शक्ती आपली वाढवूया , खेळ खेळूया खेळ खेळूया मैदानी खेळ खेळूया* मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाचा पूर्व प्राथमिक विभागाचा क्रीडा दिन उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड मनपा बालवाडी मुख्य समन्वयक व जिल्हा सहाय्यक आयुक्त गाईड समूपदेशक सौ. संजीवनी मुळे या उपस्थित होत्या. तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री प्रसाद लागू व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ वासंती बनकर उपस्थित होत्या .पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ. अपर्णा साने यांनी आपल्या प्रास्ताविकातून मुलांना मोबाईल देण्यापेक्षा मैदानावर खेळायला पाठवा व पालकांनी मुलांना वेळ देणे आवश्यक आहे असा संदेश दिला. प्रमुख पाहुणे संजीवनी मुळे यांनी आपण मुलांमधील उपजत गुणांना प्रोत्साहन देऊन मुलांचा विकास करण्यास प्रयत्न करूया ,आई ,शिक्षक व अनुभव हे मुलांचे तीन गुरू असतात. जसे पालकांचे आचरण असते तसेच मुलांचा आचरण असते असे सांगितले. व्यक्तिमत्व विकास घडविण्यात मैदानी खेळ अत्यंत आवश्यक आहे, तसेच आत्मसात केलेले कौशल्य दाखविण्याची संधी मुलांना या खेळांमधून मिळते.मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा नेहमीच प्रयत्न करत असते, मुलांमध्ये व्यायामाचे गोडी निर्माण व्हावी याकरिता सूर्यनमस्कार ,चंद्रनमस्कार, भूमीनमस्कार ,कवायत ,लेझीम, मनोरा , एरोबिक्स, रिंग खेळ,चमचा लिंबू,पोत्याची शर्यत, ताल योगा असे विविध खेळ घेण्यात आले.भारत स्काऊट गाईड अंतर्गत मुलांचे बनी संचलन घेण्यात आले.या कार्यक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास मार्गदर्शन व नियोजन मुख्याध्यापक सौ अपर्णा साने यांचे लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वर्षा दांडेकर यांनी केले व आभार सौ. गायत्री महाजन यांनी मांडले .वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम
-
जागर
जागर
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सद ... Read More
-
🌸 संस्कारधारा – संस ...
शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६रोजी पूर्व प्राथमिक ... Read More
-
शिक्षक दिन
दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसा ... Read More
-
सणांची मौज
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलक ... Read More
-
गुरु पौर्णिमा