- Events /
- शैक्षणिक सहल २०२४
शैक्षणिक सहल २०२४
शनिवार दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी गोळवलकर गुरुजी विद्यालयातील पूर्व प्राथमिक विभागातील खेळगट व कनिष्ठ गटातील मुलांची शैक्षणिक सहल भारतरत्न पंडित भीमसेन जोशी उद्यान, वरिष्ठ गटाची सहल ग्राम संस्कृती उद्यान सोमेश्वर वाडी, पाषाण येथे नेण्यात आली. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर परिसर ज्ञान प्राप्त व्हावे, निसर्ग, पर्यावरण, सांस्कृतिक गोष्टींची ओळख व्हावी यासाठी शाळांकडून सहलीचे आयोजन करण्यात येते. बागेत मुलांनी घसरगुंडी, झोका तेथील खेळ खेळण्याचा तसेच शाळेतील मित्र मैत्रिणी,ताई,मावशी यांच्या बरोबर एकत्र जाऊन सहलीचा मनमुराद आनंद घेतला. पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. अपर्णाताई साने यांच्या मार्गदर्शनाखाली सहल उत्तमरीत्या, मजेत पार पडली.
कार्यक्रम
-
जागर
जागर
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सद ... Read More
-
🌸 संस्कारधारा – संस ...
शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६रोजी पूर्व प्राथमिक ... Read More
-
शिक्षक दिन
दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसा ... Read More
-
सणांची मौज
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलक ... Read More
-
गुरु पौर्णिमा