• Events
  • /
  • संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सव – पूर्व प्राथमिक स्नेहसंमेलन

संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सव – पूर्व प्राथमिक स्नेहसंमेलन

संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सव – पूर्व प्राथमिक स्नेहसंमेलन

 *ज्ञानदेव माऊलींच्या नामात* *रंगले सारे*|

 *पालखी ,अभंग, नाटकात उमटले* *संस्कार न्यारे ||*  

 *लहान चिमुकल्यांनी दाखवला* *भक्तीचा ठेवा |*  

 *स्नेहसंमेलन ठरले आनंदाचा सोहळा नवा ||*   

शनिवार दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात पूर्व प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन अतिशय भक्तिमय व आनंदी वातावरणात संपन्न झाले. हे स्नेहसंमेलन श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व विद्यार्थी, पालक प्रतिनिधी, शिक्षक, काका–मावशी यांना तुळशीची माळ व नाम लावण्यात आले. त्यानंतर लहान चिमुकल्यांनी विविध भक्तिमय सादरीकरणांतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा ठेवा सुंदररीत्या मांडला. 

खेळगट ते वरिष्ठ गटातील विद्यार्थ्यांनी पालखी, भाकरीची गोष्ट, पहाटेचा देखावा, पैल तो गे, अजि सोनियाचा दिनु, अंबाबाई, ज्ञानदेव बाळ माझा, हरिपाठ, आरती, देवाचिये दवारी, ज्ञानेश्वर अष्टक, रंगा येई वो, मुक्ताई प्रशस्ती, रुणुझुणु रे भ्रमरा व अरे अरे ज्ञाना झालासी पावन यांवर अभंग, गीते व नृत्यनाट्यांचे सादरीकरण अत्यंत उत्साहाने केले. 

वरिष्ठ गटातील विद्यार्थ्यांनी रेड्यामुखी वेद, चांगदेव भेट व ताटी उघडा ज्ञानेश्वरा या नाट्यप्रसंगांतून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा जीवनप्रवास प्रभावीपणे सर्वांसमोर उलगडला. या स्नेहसंमेलनाचा विशेष आकर्षण ठरलेला समाधी सोहळा पाहताना उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत भावनांचे अश्रू दाटून आले. हा सोहळा कनिष्ठ गटातील विद्यार्थ्यांनी मनोभावे सादर केला. कार्यक्रमानंतर सर्व मुलांना खाऊ म्हणून लाडू देण्यात आला.स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी मा. श्री. तेजस बर्वे लाभले होते. त्यांनी सर्व मुलांचे कौतुक केले. 

तसेच हे स्नेहसंमेलन पाहण्यास उत्सुक असलेले शालासमिती अध्यक्ष मा. मिलिंद कांबळे सर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा.सौ.वासंतीताई बनकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मा. श्री. प्रसाद लागू सर, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. सौ. अपर्णाताई साने यावेळी उपस्थित होत्या.माजी मुख्याध्यापक मा. सौ‌. कल्पनाताई धालेवाडीकर, मा. सौ. मंजूषाताई खेडकर मुलांचे कौतुक पाहायला आवर्जून उपस्थित होत्या. माजी शिक्षिका उपस्थित होत्या. प्राथमिक व माध्यमिक विभागाचा शिक्षकवृंद , सर्व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्याच प्रशालेच्या शिक्षिका सौ. वर्षाताई दांडेकर यांनी केले.  संपूर्ण सोहळा यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. अपर्णाताई साने यांनी उत्तम नियोजन व मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे स्नेहसंमेलन अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरले. 

 

कार्यक्रम

  • जागर

    जागर

    जागर

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सद ... Read More

  • 🌸 संस्कारधारा – संस्कार, संस्कृती आणि कलेचा सुंदर संगम! 🌸

    🌸 संस्कारधारा – संस ...

    शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६रोजी पूर्व प्राथमिक ... Read More

  • शिक्षक दिन

    शिक्षक दिन

    दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसा ... Read More

  • सणांची मौज

    सणांची मौज

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलक ... Read More

  • गुरु पौर्णिमा

    गुरु पौर्णिमा

    *गुरुपौर्णिमा*

    *गुरू ईश्वर तात माय

    ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स