- Events /
- स्नेहसंमेलन २०२४ – दैवत छत्रपती
स्नेहसंमेलन २०२४ – दैवत छत्रपती
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक विभागाचे शनिवार दिनांक २१\१२\२०२४ रोजी स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. दैवत छत्रपती हा विषय घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटातील त्यांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे काही क्षण नृत्य व नाट्य याद्वारे सादर केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या ॲड.विभावरी बिडवे लाभल्या. तसेच शाला समिती अध्यक्ष मा. मिलिंद कांबळे सर तसेच माध्यमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक वासंती ताई बनकर व प्रसाद लागू सर उपस्थित होते. तसेच बालचमूंचे कौतुक करण्यासाठी माजी मुख्याध्यापक देखील उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. अपर्णा ताई साने यांच्या उत्तम नियोजन व मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलनाचा सोहळा पार पडला.
कार्यक्रम
-
जागर
जागर
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सद ... Read More
-
🌸 संस्कारधारा – संस ...
शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६रोजी पूर्व प्राथमिक ... Read More
-
शिक्षक दिन
दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसा ... Read More
-
सणांची मौज
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलक ... Read More
-
गुरु पौर्णिमा