• Events
  • /
  • रथसप्तमी उत्साहपूर्वक साजरी

रथसप्तमी उत्साहपूर्वक साजरी

 रथसप्तमी उत्साहपूर्वक साजरी

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय पूर्व प्राथमिक विभागात मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ रोजी रथसप्तमी साजरी करण्यात आली. १४ जानेवारीपासून मकर संक्रांत  हा सण सुरू होत असून या दिवसापासून घरोघरी हळदीकुंकू केले जाते व वाण लुटले जाते. ऋतुमानानुसार होणाऱ्या बदलांमुळे यादरम्यान येणाऱ्या सर्व भाज्यांचा समावेश आपल्या आहारात करण्यात येतो. तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे तीळ गुळ देताना म्हटले जाते. व मोठ्या व्यक्तींना नमस्कार केला जातो.मकर संक्रांती पासून सुरू होणारा हा सण रथसप्तमी पर्यंत असतो. याचवेळी मुलांना दूध ओतू जाणे व कोणत्या दिशेला जात आहे हे पाहणे प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवण्यात आले.रथसप्तमी साजरी करण्यामागचे महत्त्व सांगून सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगण्यात आले.रोज सूर्यनमस्कार घालून आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते ही माहिती ताईंनी मुलांना दिली.मुलांना खाऊ  तिळवडी देण्यात आली.हा उपक्रम आपल्या प्रशालेच्या माननीय, मुख्याध्यापक. सौ. अपर्णा साने यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे पार पडला.

कार्यक्रम

  • जागर

    जागर

    जागर

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सद ... Read More

  • 🌸 संस्कारधारा – संस्कार, संस्कृती आणि कलेचा सुंदर संगम! 🌸

    🌸 संस्कारधारा – संस ...

    शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६रोजी पूर्व प्राथमिक ... Read More

  • शिक्षक दिन

    शिक्षक दिन

    दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसा ... Read More

  • सणांची मौज

    सणांची मौज

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलक ... Read More

  • गुरु पौर्णिमा

    गुरु पौर्णिमा

    *गुरुपौर्णिमा*

    *गुरू ईश्वर तात माय

    ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स