• Events
  • /
  • पूर्व प्राथमिक विभागाचा योग दिन विशेष उपक्रम

पूर्व प्राथमिक विभागाचा योग दिन विशेष उपक्रम

पूर्व प्राथमिक विभागाचा योग दिन विशेष उपक्रम

तरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शनिवार दिनांक 20 जून रोजी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात पूर्व प्राथमिक विभागाचा 'योग दिन' हा उपक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून 'आयुर्वेद व योग चिकित्सक' असणाऱ्या डॉक्टर प्राजक्ता शिंदे उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित पालकांना 'योग साधना' या विषयी मार्गदर्शन करताना त्यांनी 'समत्वम योगम उच्यते' म्हणजेच योग करताना आपला आहार, विहार व्यायाम यामध्ये समतोल साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हा समतोल कसा साधायचा याचे मार्गदर्शन पंचकोशांच्या अभ्यासातून मिळते. 'पंचकोश विकसित करणे म्हणजेच योग व ते विकसित करताना त्यामध्ये समत्व ठेवणे म्हणजेच योग' असेही त्यांनी यावेळी सांगितले. हा समतोल मुलांमध्ये ही साधणे आवश्यक आहे अति अवघड योगासने मुलांकडून करून घेऊ नयेत. त्याचा त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होतो, मात्र ती आनंदी व निरोगी कशी राहतील याकडे लक्ष द्यावे. मुले अनुकरणप्रिय असतात त्यामुळे पालकांनीही रोजच्या रोज योग साधना करून मुलांसमोर आदर्श ठेवला पाहिजे तरच त्यांचे शरीर व मन निरोगी राहील. प्राजक्ताताईंनी यावेळी पालकांकडून ओंकार साधनाही करून घेतली व त्यानंतर वर्गावर्गातून सोपी आसनेही पालकांकडून करून घेतली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली मांडके यांनी केले .मा. मुख्याध्यापक अपर्णाताई साने यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला. या कार्यक्रमाला प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वासंतीताई बनकर याही उपस्थित होत्या. 

प्रमुख पाहुण्या अभिप्राय :- माननीय डॉ. प्राजक्ता ताई शिंदे - (आंतरराष्ट्रीय योग दिवस) यानिमित्ताने अपर्णाताईंनी आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. लहान मुलांमध्ये संस्कार रुजवत असताना त्याला 'योग' या विषयाची जोड देण्याचे महत्त्व ओळखून, त्यांनी त्यांच्या पालकांसाठी हा कार्यक्रम आयोजित करून पुढच्या पिढीसाठी एक सकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा तसेच शाळा आजूबाजूची सजावटही खूप छान आहे. 

 

कार्यक्रम

  • जागर

    जागर

    जागर

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सद ... Read More

  • 🌸 संस्कारधारा – संस्कार, संस्कृती आणि कलेचा सुंदर संगम! 🌸

    🌸 संस्कारधारा – संस ...

    शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६रोजी पूर्व प्राथमिक ... Read More

  • शिक्षक दिन

    शिक्षक दिन

    दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसा ... Read More

  • सणांची मौज

    सणांची मौज

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलक ... Read More

  • गुरु पौर्णिमा

    गुरु पौर्णिमा

    *गुरुपौर्णिमा*

    *गुरू ईश्वर तात माय

    ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स