- Events /
- पानोपानी फुले उमलती, फुलपाखरे वर भिरभिरते – खेळ गटाचा आनंददायक पहिला दिवस
पानोपानी फुले उमलती, फुलपाखरे वर भिरभिरते – खेळ गटाचा आनंददायक पहिला दिवस
**पानोपानी फुले उमलती, फुलपाखरे वर भिरभिरते**
या उक्तीप्रमाणे आज दिनांक १३ जून २०२५ रोजी मा.सा .गोळवलकर गुरुजी विद्यालयामध्ये पूर्व प्राथमिक विभागातील खेळ गटाचा पहिला दिवस अतिशय आनंदी व उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला. लहान मुलांच्या भावविश्वाशी निगडित असलेल्या फुलपाखरांचे छान सुशोधन करण्यात आले होते .छोट्या बालचमूंसाठी फुलपाखरू असलेला सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता. माननीय मुख्याध्यापक सौ. अपर्णा साने यांनी मुलांचे औक्षण केले व मुलांनी पहिले पाऊल विद्येच्या प्रांगणात ठेवले. वरिष्ठ गटातील मुलींचे लेझीम आणि वर्गात मुलांसाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या, मुलांना आपल्या संस्कृतीची देखील ओळख व्हावी यासाठी मुलांना अष्टगंध व खडीसाखर देऊन स्वागत करण्यात आले. एका सुरक्षित वातावरणातून अनोळखी वातावरणात प्रवेश करताना मुलांबरोबरच एका पालकांना देखील आज शाळेत वर्गात बसण्याची संधी मिळाली. प्रत्येक वर्गात त्यांना आवडणारी खेळणी मांडून ठेवण्यात आली होती चेंडू, सायकल, ठोकळे, घसरगुंडी खेळण्यात मुले दंग झाली होती. वर्गा वर्गातून प्रत्येक मुलाचे औक्षण व खाऊ म्हणून दिलेली पौष्टिक खिरापत खाऊन मुले "उद्या परत येणार हं! "असे ताईंना सांगून आनंदात घरी जाताना विद्यार्थ्यांना वृक्षा प्रति प्रेम,आपुलकीची भावना निर्माण व्हावी म्हणून सर्व विद्यार्थ्यांसोबत सूर्यफुलांच्या बिया देण्यात आल्या. आपणच लावलेल्या झाडाचे संगोपन करून त्याचे छान छोटेसे रोपटे तयार होते हे मुलांना अनुभवायची संधी मिळेल ही शिकवण घेऊन रडत शाळेत येणारी मुले घरी नको जायला म्हणत रडायला लागली.वंदे मातरम ने शाळेचा पहिला दिवस संपन्न झाला. आजच्या दिवसासाठी मार्गदर्शन व नियोजन माननीय मुख्याध्यापक सौ. अपर्णा साने यांचे लाभले.
कार्यक्रम
-
जागर
जागर
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सद ... Read More
-
🌸 संस्कारधारा – संस ...
शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६रोजी पूर्व प्राथमिक ... Read More
-
शिक्षक दिन
दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसा ... Read More
-
सणांची मौज
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलक ... Read More
-
गुरु पौर्णिमा