• Events
  • /
  • पालखी सोहळा २०२४

पालखी सोहळा २०२४

पालखी सोहळा २०२४

 "गळा तुळशी माळ हाती टाळ
डोई तुळस मुखी गजर
 हरिनाम घेत निघाले वारकरी
 पालखीस घेऊनी खांद्यावर" 

बुधवार दिनांक १६ जुलै २०२४ रोजी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात पूर्व प्राथमिक विभागाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. वरिष्ठ गटातील विद्यार्थ्यांकडून पालखी फरशीच्या मैदानातून फिरवण्यात आली. प्राजक्ता ताईंनी विठ्ठल नामाचा गजर घेतला. 

" पायी हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला"
 "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल"
"विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला"      प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अपर्णाताई साने यांच्या हस्ते गणपतीची आरती व विठ्ठलाची आरती घेण्यात आली. सौ. स्मिता कुलकर्णी ताईंनी संत नामदेवांची भक्ती ही गोष्ट सांगितली.आजच्या कार्यक्रमाचा प्रसाद साखर फुटाणे देण्यात आला. ‌ खेळगटातील विद्यार्थी विठ्ठल - रुक्मिणी बनून आले होते. सर्व बालचमूंनी पारंपारिक पोशाखात या दिंडीच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने आणि आनंदाने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापिका अपर्णाताई साने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. 

कार्यक्रम

  • जागर

    जागर

    जागर

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सद ... Read More

  • 🌸 संस्कारधारा – संस्कार, संस्कृती आणि कलेचा सुंदर संगम! 🌸

    🌸 संस्कारधारा – संस ...

    शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६रोजी पूर्व प्राथमिक ... Read More

  • शिक्षक दिन

    शिक्षक दिन

    दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसा ... Read More

  • सणांची मौज

    सणांची मौज

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलक ... Read More

  • गुरु पौर्णिमा

    गुरु पौर्णिमा

    *गुरुपौर्णिमा*

    *गुरू ईश्वर तात माय

    ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स