• Events
  • /
  • मौजेचा आठवडा – आनंद, खेळ आणि सृजनशीलतेचा उत्सव!

मौजेचा आठवडा – आनंद, खेळ आणि सृजनशीलतेचा उत्सव!

 मौजेचा आठवडा – आनंद, खेळ आणि सृजनशीलतेचा उत्सव!

"नाही पाटी नाही पुस्तक ,

नाही अभ्यासाचा ध्यास ,

हसण्या खेळण्या साजरा झाला ,

मौजेचा आठवडा खास "

सोमवार दिनांक २१ ऑक्टोबर ते शुक्रवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील पूर्व प्राथमिक विभागात मौजेचा आठवडा साजरा करण्यात आला .या संपूर्ण आठवड्यात मुलांसाठी अनेक आनंददायी उपक्रम घेण्यात आले.

           पहिल्या दिवशी शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने शिवाजी महाराजांवर आधारित गाण्यांची सामूहिक गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण डीएस शाळेच्या च्या संगीत शिक्षिका मा. हर्षदा ताई कारेकर तसेच गिटार वादक प्रियम कारेकर यांनी केले. माननीय हर्षदा ताई यांनी समूहगीत कसे सादर करावे याबाबत मुलांना छान मार्गदर्शन केले. व "आम्ही गड्या डोंगरचे राहणार" हे गीत साभिनय सादर करून मुलांना दाखविले. दुसऱ्या दिवशी मुलांसाठी पपेट शोचे सादरीकरण करण्यात आले. शिक्षण विवेकच्या काही ताईंनी ससा कासवाची गोष्ट पपेट द्वारे मुलांना खूपच सुंदर पद्धतीने सांगितली .सर्व मुलांनी या पपेट शोचा आनंद घेतला.

           मुलांचे आवडते खेळ जम्पिंग जॅक व मामाच्या गावाला जाणारी झुक झुक गाडी बोलावण्यात आली होती. या झुक झुक गाडीतून फिरताना आणि जम्पिंग जॅक वर उड्या मारताना सगळे  बालचमू अगदी आनंदून गेले होते. तसेच शाळेत कासार बोलावून दिवाळीच्या निमित्ताने सर्व मुलींना बांगड्या भरण्यात आल्या .यामुळे सर्व मुली खुश होऊन गेल्या होत्या.

       मौजेच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुलांसाठी दिवाळी पार्टी ठेवण्यात आली होती. दिवाळीनिमित्त सर्व मुलांना ग्रीटिंग कार्ड, पणती व खाऊ देण्यात आला. या संपूर्ण मौजेच्या आठवड्याचा सर्व मुलांनी मनापासून आनंद घेतला. माननीय मुख्याध्यापक अपर्णाताई साने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहाने पार पडला.      तसेच भारत स्काऊट अंतर्गत असलेल्या बनी टमटोलामध्ये वरिष्ठ गटातील मुलांनी दिवाळीनिमित्त पणतीचे वॉल हँगिंग केले.

कार्यक्रम

  • जागर

    जागर

    जागर

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सद ... Read More

  • 🌸 संस्कारधारा – संस्कार, संस्कृती आणि कलेचा सुंदर संगम! 🌸

    🌸 संस्कारधारा – संस ...

    शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६रोजी पूर्व प्राथमिक ... Read More

  • शिक्षक दिन

    शिक्षक दिन

    दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसा ... Read More

  • सणांची मौज

    सणांची मौज

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलक ... Read More

  • गुरु पौर्णिमा

    गुरु पौर्णिमा

    *गुरुपौर्णिमा*

    *गुरू ईश्वर तात माय

    ... Read More

त्वरित माहितीसाठी लिंक्स