- Events /
- आजी-आजोबा मेळावा २०२५
आजी-आजोबा मेळावा २०२५
,*नातवंडांच्या शाळेत खेळ व गीत रामायणाची आनंदाची अनुभूती*
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील पूर्व प्राथमिक विभागात अनेक उपक्रम राबविण्यात येतात त्यातीलच एक म्हणजे कनिष्ठ गटाचा आजी आजोबा मेळावा. मुलांच्या आजी आजोबांसाठी दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी आजी आजोबा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आजी आजोबांचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. आजी आजोबांसाठी विविध खेळ घेण्यात आले. सर्व आजी-आजोबांनी खेळामध्ये सामील होऊन मनसोक्त खेळाचा आनंद घेतला. आजी आजोबांसाठी गीतरामायणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली.
हा कार्यक्रम गायक असणाऱ्या पालकांनी उत्तमरित्या सादर केला. हार्मोनियमसाठी श्री.तुषार रिठे व तबलावादक श्री.अमित कुंटे यांनी साथ संगत केली. कार्यक्रमाचे निवेदन प्रशालेच्या माजी मुख्याध्यापक मा. सौ .मंजूषाताई खेडकर यांनी केले. गीतरामायणाची गाणी चालू असताना काही शिक्षकांनी श्रीरामाचे सुंदर असे चित्र रेखाटले व कार्यक्रमाची सांगता त्रिवार जयजयकार श्री रामा या गाण्याने झाली. या कार्यक्रमाला शाला समिती अध्यक्ष श्री.मिलिंद कांबळे सर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ वासंती ताई बनकर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री प्रसाद लागू सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व मार्गदर्शन पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक माननीय सौ .अपर्णाताई साने यांनी केले. व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सोनाली ताई पुराणिक यांनी केले.
कार्यक्रम
-
जागर
जागर
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सद ... Read More
-
🌸 संस्कारधारा – संस ...
शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६रोजी पूर्व प्राथमिक ... Read More
-
शिक्षक दिन
दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एजुकेशन सोसा ... Read More
-
सणांची मौज
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलक ... Read More
-
गुरु पौर्णिमा